भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक तथा लिपिक पदाची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार
नाशिक, दि.18:- भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28,29 आणि 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल, असे भूमि अभिलेख कार्यालयाने कळविले आहे.
सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (कॉम्पुटर बेस्ड टेस्ट ) 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर,2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबतची माहिती भूमि अभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवारांने दिलेल्या वेळेत परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन भूमि अभिलेख कार्यालयाने केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377