
पाचोरा -पाचोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती माह निमित्त लेखकांचा व वाचन चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा तसेच प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे “स्पर्धा परीक्षा सारथी “या पुस्तकाच्या लेखनाबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व शिव व्याख्याते रवींद्र पाटील यांचे वेध रायगडाचा या पुस्तकांचे मुखपृष्ठ अनावरण सोहळा नुकताच पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तदनंतर वाचन चळवळीतील कार्यकर्ते व लेखकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.सत्कार करताना आमदार किशोरआप्पा पाटील प्रांत विक्रम बांदल,तहसीलदार श्री कैलास चावडे, श्री प्रताप हरी पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल ,मा.उप नगराध्यक्ष गणेश पाटील,शितल सोमवंशी या मान्यवरांच्या हस्ते वाचन चळवळतील कार्यकर्त्यांचा/कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला प्रकल्प प्रमुख गजू भाऊ पाटील, साहित्यिक पि के सुतार, नरेंद्र पाटील ,आर आर पाटील ,सुधीर शेलार प्रमुख म्हणून उपस्थित होते.यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून साहित्य व लिखाना विषयी आपले मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी आपल्या सातारा कडील आठवणी सांगत असताना पुस्तक वाचलीच पाहिजे वाचाल तर वाचाल याची प्रचिती कशी आयुष्यात येते याबाबतीत कथन करून पुस्तके हे मनुष्याचा सर्वांगीण आयुष्य सुंदर बनवते निती मूल्य जोपासण्यास व करिअर करण्यास पुस्तके वाचन करणे किती महत्त्वाचे आहेत याबाबत विशद करीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ज्ञान आत्मसात करण्यासाठी पुस्तकांचे अनमोल महत्त्व पटवून दिले व आपली वाचना व लेखना विषयी असलेली आवड त्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवले.
तहसीलदार कैलास चावडे यांनी आपल्या मनोगत मानवी स्वभाव विषयी अनेक गोष्टींची उकल केली प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा असा प्राणी आहे की तो आपल्या जीवनाचा अर्थ शोधत असतो इतर प्राणी मात्रा त्या भानगडीत पडीत नाही तर ज्या गोष्टी नित्य नियमाच्या असतात त्या पार पाडत असतात परंतु मनुष्यप्राणी हा आपल्या जीवनाचा अर्थ शोधत असतो आणि हा अर्थ शोधण्यासाठी आयुष्याचा बोध होण्यासाठी त्याला रूपरेषा मिळण्यासाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी या संघर्षाच्या प्रवासात जर मदत व मार्गदर्शन होत असेल तर ती गोष्ट म्हणजे पुस्तक. पुस्तकाने,वाचनाने मानवी जीवन संस्कारमय होते,नीतिमूल्य राहणीमान, आचार-विचार असे सर्व बाबतीत तो सुसंस्कृत होऊन सामाजिक जीवन जगत असतो अनेक लेखक व पुस्तकांचे दाखले देत त्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
माणसाच्या गरजा या अन्न वस्त्र निवारा या जरी प्राथमिक स्वरूप असल्या तरी जनावरांपासून, आदिमानवा पासून माणूस होण्यासाठी मनुष्याला लाखो वर्षे लागली परंतु माणूस होण्यासाठी त्याला सुसंस्कृत होण्यासाठी पुस्तक हेच महत्त्वाचे असून त्यातून आपल्याला जीवनाचा समस्त सार कळतो. पुस्तकातील हजारो लाखो शब्दांनी वाचक या अथांग शब्दरूपी सागरातून डुबकी मारून आचार विचार घेत असतो व व्यक्ती मरू शकतो पण विचार नाही एवढे सामर्थ्य शब्दांत असते.त्यामुळे वाचन जोपासणे ही महत्वाचे आहे असे आपल्या मनोगतातून त्यांनी स्पष्ट केले.
शिव व्याख्याते रवींद्र पाटील यांनी आपल्या वेध रायगडाचा पुस्तका विषयी सांगताना बराच गोष्टींची उकल करीत फक्त रायगड बघणे हा एक-दोन दिवसांचा कार्यक्रम नसून तो समजून घेण्यासाठी खूप दिवस लागतात.मेहनत घ्यावी लागते अनेक किलो मीटरचा परिसर पिंजून काढावा लागतो तेव्हा कुठे आपल्याला माहिती मिळते.पुस्तक लिहिण्याचा प्रवास हा खूप खडतर होता रायगडावर येण्या जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. पैसाही खूप खर्च करावा लागत होता अशावेळी मित्रांनी सहकार्य करीत याबाबत मला मोठे योगदान त्यांच्या कडून मिळाले मनीष काबरा सारखे मित्र खंबीर पणे पाठीशी होते.मी कोणी शिक्षक नाही किंवा शासकीय कर्मचारीही नाही तरीही तुटपुंज आर्थिक परिस्थितीवर मात करीत या कामाला प्राधान्य देत पुस्तक लिहिण्याचा हा प्रवास 26 डिसेंबर रोजी सातारा येथे छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते अनावरण करून वाचकांच्या सेवेला आणणार आहे. या व्यतिरिक्तही खूप पुस्तके लिहिलेली आहेत परंतु जोपर्यंत वेध रायगडाचा पूर्ण होणार नाही तोपर्यंत इतर पुस्तके प्रकाशित करणार नाही असे ठरविले होते आता आपल्याकडून पुढील सहकार्य अपेक्षित असून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलल्यास मला त्याचे निश्चित मदत होईल असे आवाहन करीत रवींद्र पाटील शिव व्याख्याते यांनी उपस्थितांची मने जिंकत रजा घेतली.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री राजेंद्र चिंचोले सरांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना पाचोरा शहर हे जिल्ह्यात आता विकसनशील शहर म्हणून ओळखले जात आहे.येथील विकासाचा पॅटर्न बघता जिल्ह्यातही एवढा विकास होताना दिसत नाही एवढी विकास कामे आज आमदार किशोर पाटील करीत आहे.एकही आठवडा असा जात नाही की तेथे आमदार साहेबांनी विकास निधी मिळविलेला नसेल, विकास कामांचे हे पॅटर्न आता महाराष्ट्रात प्रसिद्ध होण्यापासून दूर नाही एवढी विकास गंगा या शहरातून वाहत आहे. त्यांचे कार्य हे फक्त राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसून सामाजिक व शैक्षणिक बाबतीतही ते कार्यतत्पर आहेत.अनेक ठिकाणी वाचनालयांना ग्रामीण भाग असो की शहरी तेथे पुस्तके भेट दिलेली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावात अभ्यास करणे,वाचन करणे, स्पर्धा परीक्षांचे तयारी करणे आदी गोष्टी सुलभ झालेले आहेत अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य देऊन पोलीस भरती साठी उपयुक्त ठरतील अशा सोयी त्यांनी पुरविलेल्या आहेत पुढे ते आपल्या प्रकाशित होऊ घातलेल्या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले की दहावी व बारावीनंतर मुलांना आपल्या करिअरची वाट निवडताना योग्य मार्गदर्शन हवे असते आणि तेच मी माझ्या सदर पुस्तकात मार्गदर्शन केलेले आहे पुढील जानेवारी महिन्यात पुस्तक प्रकाशित केले जाणार असून माझे नेहमीच स्पर्धा परीक्षा असो,करिअर संदर्भात मार्गदर्शन करीत राहणार असल्याचे सांगितले.
आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना वाचन व पुस्तके यांचे आमचे जरी जवळचे नाते नसले तरी आम्ही पुस्तके वाचत नाही तर माणसेच वाचून काढतो असे बोलून उपस्थितांची मने जिंकली. आजच्या बदलत्या युगात वृत्तपत्र माध्यम असो किंवा इलेक्ट्रॉनिक अथवा डिजिटल मीडिया खूप मोठे क्रांती झालेली असून आता पुस्तके ज्याप्रमाणे वस्तू रुपी प्रकाशित होत आहे तसेच सर्व लेखकांनी पुढील काळात डिजिटल आवृत्ती मध्ये प्रकाशने करावी जेणेकरून सदर पुस्तकांच्या प्रति किंबहुना सर्व माहिती ही वाचकांना डिजिटल माध्यमातून वाचावयास मिळेल रोजच्या धकाधकीच्या जीवनात किंबहुना वेळेअभावी वाचण्यास वेळ मिळत नसल्याने विविध प्रकारच्या डिजिटल माध्यमांचा उपयोग करून ऑडिओ स्वरूपात असो व्हिडिओ स्वरूपात असो किंवा टेक्स्ट स्वरूपात अशा प्रकारच्या आधुनिक युगातील तांत्रिक संसाधनांचा वापर करून आपल्या श्रोत्यांपर्यंत,वाचकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे आमदार साहेबांनी त्यांच्यामार्फत अनेक ग्रामीण भागातील किंवा शहरी भाग येथे शैक्षणिक तसेच व्यायामाचे साहित्य दिलेले आहे शिवाय वेळोवेळी अनेक ग्रामीण भागातील लायब्ररीला पुस्तके ही डोनेट केलेली आहेत याशिवाय येणारा काळात अत्याधुनिक वाचनालय निर्माण करून आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा,नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना साहित्याची आवड निर्माण होऊन त्यांना वाचन छंद निर्माण होईल व समाज प्रगतीपथावर जाईलही परंतु असे चित्र आज आहे की अनेक ठिकाणी 5 ते 10 लोकंच वाचनालयात जाताना दिसतात ही उदासीनता दूर झाली पाहिजे व त्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलून साहित्यिकांनीही डिजीटल माध्यमातून लोकांना परिचित झाले पाहिजे.प्रकाशित होऊ घातलेल्या पुस्तकांच्या जास्तीत जास्त प्रती घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी द्विय लेखकाना दिले.

या कार्यक्रमास पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध वाचनालयांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच विद्यार्थी व वाचनाचा छंद जोपासणारे रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाकरे सर व सूत्र संचालन बी.ऐन.पाटील सर तर आभार कृष्णा पाटील सरांनी केले तसेच यशस्वीतेसाठी भैया शिंदे,शशीभाऊ महाजन, उमेश महाजन ,पितांबर भोसले ,मनोज पाटील ,वाघ सर नामदेव पाटील, कुंभार सर ,जगताप सर,एन एस पाटील सर,नितीन चौधरी,नितीन वसंत पाटील, किशोर पाटील,पंकज जाधव,बंडू सोनार,अमरदीप पाटील तसेच परिसरातील रहिवासिंनी अनमोल सहकार्य केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



