पाचोरा-पंचायत समिती पाचोरा येथे असलेल्या दिव्यांग कक्ष येथे जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त दिव्यांग कक्ष पाचोरा पंचायत समिती येथे प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बन्सीलाल बापू यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी दिव्यांग कक्षात मा.आबासाहेब महाले( दिव्यांग कक्ष अधिकारी) यांनी बन्सीलाल बापूसाहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच इतर मान्यवरांचे देखील दिव्यांग लाभार्थीच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बन्सीलालबापू पा.यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व दिव्यांग लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले व दिव्यांग लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माननीय आबासाहेब महाले (दिव्यांग कक्ष आधिकारी) यांच्या हस्ते देखील दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड वाटप करण्यात येऊन,दिव्यांग लाभार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र या वेळी दिसून आले. प्रसन्न वातावरण कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377