माणुसकी ग्रुप कळमसरा यांचा स्तुत्य उपक्रम
पाचोरा- कळमसरा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने माणुसकी ग्रुप कळमसरा व रेड प्लस ब्लड बँक यांच्या विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक २० डिसेंबर २०२२ वार मंगळवार रोजी सकाळी ०९ वाजेपासून दुपारी ०१ वाजेपर्यंत पार पडले.
रक्तदान शिबिर प्रसंगी रक्तदात्यांनी रक्तदान केले.या उपक्रमास कळमसरा गावाचे सरपंच अशोक दादा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई चौधरी, डॉ.महेंद्र गीते,डॉ.प्रियंका गीते गीते (संचालक डेंटल क्लिनिक शेंदुर्णी), प्रशांत महाले,जामनेर हे मान्यवर उपस्थित होते.डॉ.गीते परिवाराने प्रत्येक रक्तदात्यास श्रीमद् भगवतगीता जीवन ग्रंथ भेट दिला.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे हा खरा धर्म संत गाडगे महाराज यांनी सांगितला त्यामुळे आपण रक्तदान करून प्रत्येक माणसाला मदत करण्यासाठी पुढे आलो पाहिजे असे माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला गौरव पत्र व श्रीमद् भगवतगीता जीवन ग्रंथ देऊन गौरवण्यात आले.
यावेळी गजानन तेली,श्रावण न्हावी, प्रशांत महाले,शिवाजी माळी,तुषार उशीर,विजय धोबी,गोपाल माळी,गजानन पाटील,गणेश पांडव,दत्तात्रय तेली, समाजसेवक गजानन क्षीरसागर ,माणुसकी ग्रुप कळमसरा व गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले.
रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377