प्रा शिवाजी शिंदे यांचा कन्या विद्यालयातर्फे सत्कार
पाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. शिवाजी शिंदे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांचे तर्फे नुकताच डॉक्टर आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड 2022 हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने कन्या विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात प्रा. शिवाजी शिंदे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, रवींद्र चव्हाण, प्रा प्रतिभा राठोर, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. संगीता राजपूत, प्रा. प्रतिभा पाटील, ज्येष्ठ शिक्षक जयदीप पाटील, सुभाष जाधव, उज्वला देशमुख, कुंदा पाटील -शिंदे, अंबालाल पवार, सुरेखा बडे, निवृत्ती बाविस्कर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आबाजी पाटील, हिरालाल परदेशी, शिवराम पाटील, शकील खाटीक, धनराज धनगर आदी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377