विधान भवनात लागणार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची माहिती
नागपूर, दि. २७ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण सोहळा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवार, दिनांक २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ॲड. नार्वेकर यांनी दिली.
माहे ऑगस्ट, २०२२ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे समारंभपूर्वक झळकणार आहे. या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनी यावेळी सर्व सदस्यांना केली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377