नाशिक विभागाची पदवीधर मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2022 आचार संहिता कक्ष स्थापन
मा. भारत निवडणूक आयोगाने, दिनांक: 29 डिसेंबर, 2022 रोजी प्रसिध्दी पत्रकान्वये, नाशिक विभागाची पदवीधर मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2022 निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघ नाशिक विभाग यामध्ये आचार संहिता लागु झालेली आहे. त्याअनुषंगाने निवडणुक प्रक्रिये दरम्यान नाशिक विभागतील (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर) कोणत्याही व्यक्तीने केलेल्या प्रत्येक तक्रार निवारण करणेकामी,मा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नाशिक यांचे कार्यालयात 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 0253/2469412 असा आहे.जळगांव जिल्हयात तक्रार निवारण करणेकामी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जळगांव जिल्हयातील आचारसंहिता कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 0257/2217193-2223180 Toll Free No – 1077 असा आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा ,आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी,नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2022
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377