जिल्ह्यातील उद्योजकांनी रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा

जळगाव,दि.12– रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील दहावी पास ते पदवीधारक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. उद्योजकांच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात / कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देऊन या योजनेतुन तीनशे ते एक हजार रुपये पर्यत शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन शासनामार्फत देण्यात येते.
जळगाव जिल्ह्यातील ज्या उद्योजकांना / कंपन्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा उद्योजकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव वि. जा. मुकणे यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



