आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे भाजपाने उठवला आवाज

नगरपरिषदकडुन होणाऱ्या दूषित पाणीपुरवठा व घाणीने तुडुंब भरल्या गटारी, नगरपरिषद विरोधात भाजपा आक्रमक

पाचोरा,दि ३0- येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी आज पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देऊन पाचोरा नगर परिषदेकडून सर्वच भागातील नागरिकांना होणारा दूषित व गढूळ पाणीपुरवठा व गटारी मध्ये झालेले घाणीचे साम्राज्य या विरोधात आवाज उठवत प्रत्येक सामान्य नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निवेदनात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून पाचोरा नगरपरिषदेकडून होणाऱ्या पाणीपुरवठया मध्ये पिण्याचे पाणी दूषित व गढूळ येत असून संपूर्ण शहरात या पाण्यामुळे डायरिया,कॉलरा यासारख्या आजारांच्या साथी आल्या आहेत. शहरातील सर्वच नागरिक या परिस्थितीत अडचणींना सामोरे जाताना दिसता आहेत. तसेच सतत पडणाऱ्या पावसामध्ये भुयारी गटार सफशेल फेल ठरली असून नियोजनशून्य असणाऱ्या या कामामुळे भुयारी गटारीच्या चेंबूर मधील पाणी नियमित गटारी मध्ये वळवण्यात आले आहे.व त्यातच सततच्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने गटारी तुडुंब भरल्या त्यानंतर यातील सर्व पाणी व घाण लोकांच्या घरात शिरले व रस्त्यावर देखील घाणीचे साम्राज्य तयार झाले.
त्यामुळे विविध आजारांच्या साथीचा फैलाव होण्यास सुरुवात झाली.तसेच नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असून यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार माजी शहराध्यक्ष नंदूबापू सोमवंशी सरचिटणीस दीपक माने ज्येष्ठ पदाधिकारी रमेश श्यामनाणी भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे जगदीश पाटील वीरेंद्र चौधरी टिपू देशमुख भैया ठाकूर सईद खान गोविंद देवरे विशाल साठे जगन्नाथ सोनवणे संदीप पाटील महावीर मुनोत पितांबर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!