तायक्वांदो स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

पाचोरा- नुकत्याच जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले आहे. 17 वर्षा आतील गटात कु.ललित मनोज महाजन याने 68 ते 73 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.कु.स्मिती प्रवीण पाटील हिने 42 ते 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तर कु.ऋतुजा रणजीत पाटील हिने 44-46 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांची धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी प्राचार्य श्री. गणेश राजपूत उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे यांनी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेतील क्रीडा शिक्षक श्री नंदकिशोर पाटील श्री.गणेश मोरे, श्री. अरविंद पाटील, श्री वैभव हटकर, श्री. जितेंद्र पाटील, सौ लक्ष्मी पाटील या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांना लाभले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



