आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

जळगावात राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न मुलांच्या गटात अमरावती विभाग तर मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाची बाजी

            जळगाव,दि. 27- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने व जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. 24 ते 25 जानेवारी, 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय सन 2022-23 शालेय कबड्डी क्रीडा (14 वर्ष मुले/मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            या स्पर्धेतंर्गत 25 जानेवारी, 2023 रोजी स्पर्धांतील अंतीम सामना व तृतीय क्रमांकाचे सामने पार पडले. मुलांच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यामध्ये लातुर विभागातील भगतसिंग विद्यालय, भिसे वाघोली, ता. जि. लातूर यांनी नाशिक विभागातील माध्यमिक विद्यामंदिर ब्राम्हणवाडे, नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात 57-38 अशा 19 गुणांच्या फरकाने लातूर विभागाने सामना जिंकून तृतीय क्रमांकाचे स्थान मिळविले. तर अंतिम सामन्यामध्ये अमरावती विभागातील श्री. मैनागिरी महाराज विद्यालय, टो जुमडा फाटा, ता. जि. वाशिम यांनी औरंगाबाद विभागातील विद्यानिकेतन हायस्कूल, गंगाखेड, ता. गंगाखेड, जि.परभणी यांच्यात झालेल्या सामन्यात 44-19 अशा 25 गुणांच्या फरकाने अमरावती विभागाने सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले.

            मुलींच्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यामध्ये मुंबई विभागातील अवर लेडी ऑफ नाझरेथ हायस्कुल, भाईदर यांनी अमरावती विभागातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा फसी, ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती यांच्यात झालेल्या सामन्यात 60-37 अशा 23 गुणांच्या फरकाने मुंबई विभागाने सामना जिंकून तृतीय क्रमांकाचे स्थान मिळवले. तर अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर विभागातील शिवाजी हायस्कुल, बावची, ता. वाळवा, जि. सांगली यांनी पुणे विभागातील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पूणे यांच्यात झालेल्या सामन्यात 54-20 अशा 34 गुणांच्या फरकाने कोल्हापूर विभागाने सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले.

            राज्यस्तरील शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल याप्रमाणे- (प्राविण्य- संघाचे नाव, मुले/मुली) प्रथम-अमरावती, कोल्हापूर, द्वितीय-औरंबागाद, पुणे, तृतीय-लातुर, मुंबई. याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा कबड्डी असोसिएशन, जळगांव यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!