स्व.कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पाचोरा, दि२७ – संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा जिल्हा जळगाव येथे 74 वा गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मीनाक्षी पांडे मॅडम यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून एम डी असलम सर सीआरसी सेंटर नागपूर पिडिलाइट कंपनी डिपार्टमेंट ऑफ पुणे चे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अविनाश कदम सर, कुलदीप पवार सर पिडिलाइट कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर रुपेश कोतकर सर तसेच बजरंग मिस्तरी,अरुण मिस्तरी,किशोर मिस्तरी,अरविंद सुतार,प्रवीण शार्दुल,धनराज मिस्तरी,रवी मिस्तरी,सचिन मिस्तरी, अमोल मिस्तरी तसेच संस्थेचे सचिव प्रदीप पांडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. राष्ट्रध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर विशेष मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पांडे सर यांनी केले तर नंतर कार्यक्रमाचे अतिथी एम डी असलम सर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर अविनाश कदम सर यांनी मनोगत व्यक्त केले.मनोगतामध्ये या विशेष विद्यालयास एका वर्गासाठी राऊंड टेबल बनवून देण्याची घोषणा केली.यानंतर विशेष मुलांनी देशभक्तीपर आणि खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण गीतांवर नृत्य सादरीकरण केले
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी विशेष मुलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचा समारोप विशेष विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377