परिवहनेतर वाहनांचा समुच्चयन उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध
जळगाव, दि. 31- शासन अधिसूचना (गृह विभाग) यांच्या दिनांक 19 जानेवारी, 2023 च्या अधिसूचनेनुसार परिवहनेतर संवर्गातील (जसे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी) या वाहनांच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गंभीर स्वरुपाच्या व्यावहारिक समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांच्या रस्ता सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच परिवहनेतर वाहनांचा वाहन समुच्चयन करण्यासाठी उपयोग होण्याची व त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील वैध परवाना प्राप्त करुन वाहतूक करणा-या वाहनांच्या आर्थिक व्यवहार्यवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील नागरिक व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता परिवहनेतर वाहनांचा समुच्चयनाच्या उद्देशासाठी वापर करण्यास मनाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे परिवहनेतर वाहनांना (दुचाकी, तीनचाकी व चारचाकी) या वाहनांसह समुच्चयनाच्या व राईड पुलींगच्या उद्देशासाठी वापर करण्यास अधिसूचनेद्वारे शासनाकडून प्रतिबंध करण्यात आले आहे. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
तरी अशाप्रकारे परिवहनेतर वाहनांद्वारे अॅपच्या आधारे राईड पुलींग (भाडेतत्वावर प्रवासी वाहतूक) प्रकारचा व्यवसाय करतांना आढळून आल्यास संबंधितांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377