कृषि कार्यालयासाठी जागा भाड्याने पाहिजे

जळगाव, दि.1 :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कार्यालयास अदांजीत 1200 ते 1500 स्केअरफुट जागा स्टोअर/रेकॉर्डरुम/किंवा कार्यालयीन उपयोगासाठी भाडयाने घ्यावयाची आहे. त्यासाठी गावात जवळपासच्या भागात ज्यांना जागा भाडयाने दयावयाची आहे, त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधुन आपला अर्ज व कागदपत्र आठ दिवसात सादर करावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग ठरवून देईल, त्याबाबत भाडयाने देण्यास संमती पत्र. जागेचा नकाशा, सातबारा उतारा व कार्यालय भाडयाने घेतांना जी आवश्यक कागदपत्र लागतील ती कागदपत्र पुरवण्याची जबाबदारी घरमालकाची राहील. शासन निर्णयानुसार या कार्यालयास रु 20,000/- पर्यंत भाडे मंजूरीचे अधिकार असुन त्या मर्यादेत किंवा त्यापेक्षा कमी दरात जागा देण्यास तयार असतील व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठरवून देईल, त्यांचेच अर्जाचा विचार केला जाईल. असेही श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



