जळगावात 27 फेब्रुवारी रोजी डाक पेन्शन अदालतीचे आयोजन

जळगाव – दि.13 -डाक विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक विभागातर्फे डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयात दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अधिक्षक डाकघर (मुख्यालय), जळगाव बी. व्ही. चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दाखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे जसे वारस इ. तसेच नाती आधारित सूचना/तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असेही श्री. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



