आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली भव्य साखळी रास्ता रोको आंदोलन


पाचोरा, दि १५ – चाळीसगाव – पाचोरा – जळगांव MH753J या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे मा. आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतर्फे दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाच वेळी साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मा. आमदार दिलीप वाघ व महाविकास आघाडीतर्फे आज १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आज १५ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले की, जळगांव ते कजगाव दरम्यान ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झाली असुन अनेक वेळा निवेदने देवुन सुद्धा रस्त्यांचे काम होत नसल्याने रस्ता रोको सारखा पवित्रा घेण्यात येत आहे. या रस्त्यावर अनेक निष्पापांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. रस्ते भुसंपादन विभागाचे अधिकारी हे माझ्या निवासस्थानी आले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. काही आडमुठे अधिकाऱ्यांमुळेच रस्ता दुरुस्तीसाठीच २१ फेब्रुवारी रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, क्षत्रिय गृपचे धनराज पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक तथा महापुरुष सन्मान समिती किशोर डोंगरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
जळगाव ते चाळीसगाव पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे असून सदरचे काम सोडून दिलेल्या स्थितीत आहेत. तसेच रस्त्याच्या धुळीमुळे डोळ्यांना डोळ्यांच्या दुखापतींचा त्रास होत असून खड्यामुळे नागरिकांना मणक्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासोबत वाहनांचा दुरुस्ती खर्च देखील वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांनी व सत्ताधारी मंत्री खासदार आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी या अत्यंत भयानक संकटाचा विचार करून सदर रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी त्वरित डांबरीकरण करून सर्व अपघातग्रस्त ठिकाणांसह संपूर्ण रस्त्यांचे त्या स्थितीमध्ये डांबरीकरण करण्यात यावे. या रास्त मागणीसाठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एकाच वेळी ५ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या परिषदेस पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, मा. नगरसेवक भूषण वाघ, अजहर खान, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तायडे, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते खलील देशमुख, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जैन, जितेंद्र जैन, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, रणजीत पाटील, पी. डी. भोसले, क्षत्रीय गृपचे संचालक धनराज पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, रा. काॅं. चे युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, रा. काॅं. भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, रा. काॅं. भडगाव युवा शहर अध्यक्ष कुणाल पाटील, अभिजीत पवार भडगाव शहराचे कार्याध्यक्ष हर्षल पाटील.,(नगरदेवळा), पिंटु भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!