आनंदाचा शिधा व इतर योजनेच्या लाभार्थ्यांशी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साधणार संवाद
जळगाव, दि.12 : – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा व इतर योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण हे आज (13 एप्रिल रोजी) सायंकाळी 4.30 वाजता व्हीडीओ कान्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होणे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी समजून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या संवाद कार्यक्रमासाठी आनंदाचा शिधा संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी, शिवभोजन थाळी या योजनांचा लाभ घेतलेले प्रत्येक जिल्ह्यातून 50 लाभार्थी सहभागी होणार आहे. उपस्थित लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. जळगाव जिल्ह्यातूनही या योजनांचे 50 लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा विज्ञान व सुचना कार्यालयात (NIC) उपस्थित राहणार असल्याची माहिती सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी दिली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377