जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्नमहामार्गावर दर्शनी भागात गती मर्यादेचे फलक लावावे- जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव,दि.13: – जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक तेथे वाहनाच्या गती मर्यादेचे फलक दर्शनी भागात लावावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेत.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस भारतीय राष्ट्र महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एन. एम. सिन्हा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, जिपचे कार्यकारी अभियंता एस.सी.धिवरे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शहरातून जाणा-या महामार्गावर गर्दीच्या ठिकाणी आवश्यकता बघून हायमास्ट लावण्याचे नियोजन करावे. नियमानुसार नसलेले गतिरोधक काढून टाकावेत. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. डायव्हरशन व ब्लॅकस्पाॅटच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. त्याचबरोबर भविष्यात अपघात टाळण्यासाठी आवश्यकता असल्यास नवीन ब्लॅक स्पाॅट निश्चित करण्याची सुचनाही त्यांनी केली.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



