डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पांडे मतिमंद निवासी विद्यालयात उत्साहात साजरी
पाचोरा – श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भिमाईच्या पुण्याईने या ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दिव्यांग पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक तायडे सर तर प्रमुख मान्यवर म्हणून प्रवीण बाविस्कर नितेश घोडे शत्रुघन सोनवणे विशाल खैरनार अविनाश जंजाळे राणीताई सोनवणे आधी उपस्थित होते याप्रसंगी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री ज्ञानेश्वर रामकोर सुभेदार यांनी शाळेला भेट दिलेल्या संविधान उद्देशिकेचे अनावरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तदनंतर प्रमुख सर्व मान्यवरांचे दिव्यांग विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर भिमाईच्या पुण्याईने या ग्रुपने दिशा प्रकल्पाचे वर्कबुक विद्यार्थ्यांना भेट दिले तसेच शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा या ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आल्या याप्रसंगी श्री तायडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजेश निकम बंटी निकम संतोष सुरवाडे अमोल सोनवणे सागर सोनवणे प्रवीण खरे दीपक पेंढरकर नितीन अहिरे प्रवीण खैरे अमोल सोनवणे सिद्धार्थ अहिरे आधी सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप करून करण्यात आला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377