सुट्टीवर आलेल्या जवानाने उन्हाळा लक्षात घेता मोफत लिंबू सरबत वाटप करून जोपासली माणुसकी.
माणुसकी ग्रुपच्या कार्याने प्रेरित होऊन राबविला उपक्रम
लोहारा
– तालुका पाचोरा येथील रहिवासी व सध्या आर्मीमध्ये देश सेवा बजावणारे जवान संदीप संतोष बाविस्कर (ग्रीफ)सुट्टीवर आले असल्याने माणुसकी ग्रुप चे निस्वार्थी कार्याने प्रेरित होऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या ऊदेशाने त्यांचे मित्र माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांना आपण काय उपक्रम राबवू शकतो, तेव्हा त्यांनी उन्हाळा लक्षात घेता लिंबू सरबत वाटप करण्याचा सल्ला दिला. संदीप बाविस्कर यांनी ही लागलीच होकार दिला. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सर्व महिला,पुरुष,लहान मुले यांना शक्तिवर्धक लिंबू सरबत वाटप करण्यात आले.
यावेळी प्रभाकर चौधरी, लकी टेलर,सुभाष गीते, समाजसेवक गजानन क्षीरसागर,जवान संदीप बाविस्कर,रमेश लिंगायत,आदित्य धनगर, हर्षल चौधरी.ज्ञानेश्वर कुमावत,माणुसकी ग्रुप सदस्य उपस्थित होते.
माणुसकी ग्रुपच्या निःस्वार्थी कार्याने प्रेरित झालो…
समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून आज मोफत लिंबू सरबत वाटप केले.आज समाजामध्ये माणुसकी ग्रुप निस्वार्थ समाजाची सेवा करीत आहे.व मी माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून समाजाच्या गरीब व गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करीत राहील.
जवान संदीप बाविस्कर (ग्रिफ).
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377