पाचोरा येथील वृंदावन सायबर रेल्वे तिकीट प्रकरणी सखोल चौकशी व्हावी – संदीप महाजन

पाचोरा– शहरातील भडगावरोड वरील कृषी उत्पन्न बाजार समीती समोरील योगेश वाणी संचलीत वृंदावन सायबर मध्ये अमानुष अवाजवी रक्कम आकारुन ऑनलाईन सेवा देणे सोबतच रेल्वेची अनधिकृत टिकीट विक्रीचा व्यवसाय देखील मोठया प्रमाणावर सुरु असल्याची तक्रार ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांनी केली होती
यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या RPF भुसावळ (Crime Intelligence Branch) यांनी दखल घेऊन तक्रारीची सत्यता पडताळून दिनांक 15 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाचोरा येथील वृंदावन पॅलेस इंटरनेट कॅफेवर धाड टाकत त्यावरून योगेश वाणी नामक संशयित दुकान चालकाकडून कॉम्प्युटरचे 18 यूजर आयडी पैकी त्यातील ४ बंद व उर्वरित १४ यूजर आयडी वरून सुमारे १७ हजार रुपये किमतीची ८ तिकिटे, एक सीपीयू व एक मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेऊन संबधित आरोपीस मुद्देमालसह जळगाव आरपीएफ कडे सुपूर्त करण्यात आले आहे
जळगाव आर पी एफ तर्फे संशयीताकडून सविस्तर तपशील घेण्याचे काम सुरू असून, याचा पुढील तपास जळगाव आर पी एफ अधिकारी महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली RPF एस. बी. चौधरी हे करीत आहेत
परंतु सदर प्रकरणी आरोपीस अटक & सुटका तसेच घटनास्थळी पंचनाम्यात नेहमीचे मॅनेज साक्षीदार न घेता जबाबादार शासकीय कर्मचारी घेण्यात यावेत & संबधित आरोपीचा मोबाईल व संगणकाचा जो CPU जप्त केला आहे. तज्ञांमार्फत त्या मधील CDR फाईल आधारे सखोल चौकशी होऊन बरीच मोठी लिंक त्या संबधित 2 मुली कोण रेल्वे टिकीटांसाठी कोठ- कोठून हाताळणी केली जात होती यासर्व बाबींची चौकशी होणेसाठी संदीप महाजन यांनी रेल्वे प्रशासनाच्या दिल्ली पासुन ते मुंबई स्तरावर निवेदन वजा चौकशी होणे कामी मागणी अर्ज पाठवला आहे
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



