चाळीसगाव येथील घरफोडीतील आरोपी जळगाव एलसीबीच्या कारवाईत अटकेत.

जळगाव – दिनांक ०१/०२/२०२५ ते दि/०२/२०२५ चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकातील भवानी ट्रेडिंगच्या बाजुला घरफोडी झाल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. ला CCTNS NO ४१/२०२५ भा.न्या.सं. ३०५,३३०,(१)(२),३३१(३)(४) प्रमाणे दिनांक ०४/०२/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून मिळालेले तांत्रिक पुराव्या वरून चाळीसगाव येथील संशयीत साजनसिंग टाक हा निष्पन्न झाल्याने त्याचे हालचालीवर लक्ष ठेवून त्याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक, वय 50 वर्षे, रा. इनपुन पुनर्वास, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश हा निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्यानंतर लागलीच चाळीसगाव येथून साजनसिंग रुपसिंग टाक, वय 50 वर्षे, धंदा मजुरी, रा.बसस्टँडमागे,चाळीसगांव ता.चाळीसगांव जि. जळगांव यास ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी चाळीसगाव शहर पो.स्टे.ला CCTNS NO ४१/२०२५ भा.न्या.सं. ३०५, ३३०(१)(२),३३१(३)(४) या गुन्ह्याची कबुली देवून १९३०००/- रु. रोख रक्कम, ५,१०,०००/- रु. रक्कमेचे 59.53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, १,१५,०००/- रु. कि.चे 1374.65 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने असे एकुण ८१८०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी 1) प्रेमसिंग रामसिंग टाक, वय 50, रा. इनपुन पुनर्वास, ता.पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश, 2) साजनसिंग रुपसिंग टाक, वय 50, रा. बसस्टँडमागे, चाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव यांना चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS NO ४१/२०२५ भा.न्या.सं. ३०५,३३०,(१)(२),३३१(३)(४) या गुन्ह्यात अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक १५/०२/२०२५ पावेतो ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री शेखर डोमाळे, पोह सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, राहुल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, प्रियंका कोळी, दिपक चौधरी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केला आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



