इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ
जळगाव, दि.23 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याकडून घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेला आहे. अशा लाभार्थ्यांनी एकरक्कमी थकीत कर्ज भरुन खाते बंद केल्यास या लाभार्थीस थकीत व्याजात 50 टक्के सवलती देण्यात येते. या योजनेस 30 एप्रिल, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
थकीत कर्ज असलेल्या लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून त्यांचेकडील थकीत कर्ज एकरकमी भरून थकीत व्याजावर 50 टक्के सवलत घेवुन आपले कर्ज खात बंद करावे. तसेच कर्ज थकबाकीदारांनी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ, जळगांव येथे संपर्क साधावा. असे आवाहन दिनेश चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377