पाचोरा महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
पाचोरा, दि 6 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे दि: 6 जून 2023 रोजी फेब्रुवारी – 2023 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी सादर केले तर कनिष्ठ महाविद्यालयीन निकालाचा उंचावता आलेख पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील यांनी सादर केला.
कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विभागातून प्रथम दिपाली प्रल्हाद सोनवणे, द्वितीय अर्णव नितीन पाटील व तनिष्का महेंद्र पाटील, तृतीय सिद्धेश शैलेंद्र खंडेलवाल, कला शाखेत प्रथम जानव्ही प्रदीप निकुंभ, द्वितीय भाग्यश्री दिगंबर पाटील, तृतीय आदिती पुरुषोत्तम पाटील तसेच वाणिज्य विभागात प्रथम लहेर किशोर पटेल, द्वितीय तेजस्विनी सुभाष मारवाडी व गायत्री कमलकिशोर अग्रवाल, तृतीय चिन्मय राजकुमार रतनानी तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट या ट्रेडमध्ये प्रथम पंचशीला सुरेश सोनवणे, द्वितीय संदीप हरी पाटील, तृतीय मयुरी अनिल महाले, मेडिकल लॅब टेक्निशियन या ट्रेडमध्ये प्रथम प्रतिभा महादू पाटील, द्वितीय अमृता अनिल कदम, तृतीय शेख जावेद मोहम्मद हनीफ, अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट या ट्रेडमध्ये प्रथम महेश संजय पाटील या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. विज्ञान विभागातून प्रथम दिपाली सोनवणे, कला शाखेत प्रथम जानव्ही निकुंभ तर वाणिज्य विभागात प्रथम लहेर पटेल या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे मत प्रतिपादित केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू भगिनी यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे प्रमुख नानासाहेब सुरेश देवरे, संस्थेचे जेष्ठ संचालक सतीश चौधरी, शैलेंद्र खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, एडवोकेट अविनाश सुतार, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले, ऋषिकेश ठाकूर, पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील, विद्यार्थी, पालक, शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा डॉ जे पी बडगुजर यांनी सर्व मान्यवरांच्या प्रती आभार व्यक्त केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377