पाचोरा,दि.6 – पाचोरा शिवतीर्थ मैदानावर शिवसेना पाचोरा यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमातील उल्लेखनीय बाब म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तेरावे वंशज राजे भागवत राव मानसिंगराव जाधवराव आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तेरावे वंशज राजे धिरजसिंग मोहिते हंबीरराव यांची प्रमुख उपस्थिती. दोन्हीही मान्यवरांचे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांसह स्वागत करण्यात आले.दोन्ही मान्यवरांचा पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी सत्कार करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवचरित्र घराघरात पोहचावे विद्यार्थ्यांचं्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रंगभरण स्पर्धा संपन्न झाली.विजेते आणि सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
शिवचरित्राचा जागर महाराष्ट्रभर करणार्या आपल्या मतदार संघातील शिवव्याख्याते आणि शिवशाहीर शिवाजीराव पाटील, विठ्ठल महाजन, रविंद्र पाटील, सचिन देवरे, संतोष पाटील ,माणिक पाटील, हर्षल पाटील, परशुराम सुर्यवंशी,एस.ए.पाटील या सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. आपल्या शहरात असे नविन नविन संकल्पना मांडून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात हातखंडा असणारे शिवसैनिक गजू पाटील यांचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले. आपल्या मनोगतात राजे भागवत राव यांनी महाराष्ट्रात छत्रपती शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि शिवछत्रपती च्या विचारांवर चालणारे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उल्लेख करून आमदार महोदयांचे कौतुक केले.
कार्यक्रमास पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापूसो गणेश पाटील, प्रा.राजेंद्र चिंचोले,शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावरकर, शितल सोमवंशी ,पि.आय.खताळ साहेब, युवानेते सुमित पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन श्री बि.एन पाटील, प्रास्ताविक श्री.विजय ठाकूर सर यांनी, आभार गजू पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेन्द्र भिमराव पाटील, श्री.चौधरी सर,श्री.नितीन पाटील,श्री सतिश सोनवणे, कृष्णा पाटील, उमेश महाजन,शशीभाऊ,भोसले सर,भैय्या भाऊ शिंदे, जितेंद्र जगताप,अरूण कुंभार,अनिकेत सुर्यवंशी, किशोर चौधरी,किरण चौधरी,बाला राजपूत,सुरेश कदम, सचिन वाबळे,सुतार सर ,पंकज देठे विजय पाटील भाऊसाहेब बोरसेआदि नी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377