पाचोरा येथे 12 जून रोजी स्व.तात्यासाहेब आर.ओ.पाटील “व्यापारी भवन” भूमिपूजन समारंभ सोहळयाचे आयोजन

पाचोरा,दि.11- स्व.तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी भवनाचे स्वप्न कार्यसम्राट आ.किशोरआप्पा पाटील यांचे प्रयत्नाने पूर्ण होत असून सर्व व्यापारी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.बहूप्रतीक्षित असे व्यापारी भवण निर्माण होणार असल्याने शहरातील व्यापारी वर्गाला हककांचे दालन प्राप्त होईल त्यांचे व्यावसायिक मीटिंग,कार्यक्रम,तसेच उद्योजक ट्रेनिंग आदि गोष्टी साठी ऐक स्वतंत्र व्यवस्था निर्माण होनार असल्याने भविष्य काळातील निकड पूर्ण होणार आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून यास निधी उपलब्ध करून दिला यामुळे पाचोरा शहराच्या विकासात अजून ऐक भर पडली आहे. असाच विकास कामांचा झंजावात सुरू असल्यास पाचोरा शहर हायटेक शहर म्हणून नक्कीच महाराष्ट्रात उदयास आलेले असेल.
दि 12 जून सोमवार साय. 5 वा सदर “व्यापारी भवन” भूमिपूजन समारंभ सोहळा भडगाव रोड, कृषि उत्पन्न बाजार समिती समोर पाचोरा जिल्हा जळगांव येथे संपन्न होणार आहे. स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवनाचे भूमिपूजन माननीय आमदार किशोरआप्पा पाटील यांचे हस्ते होणार असून,प्रमुख उपस्थिती रावसाहेब पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना, गणेश पाटील सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगांव, तालुका प्रमुख सुनीलआबा पाटील,संजय गोहील मा. नगराध्यक्ष शरद पाटे मा. उपनगराध्यक्ष, प्रियंका पाटील मा.उपनगराध्यक्ष तसेच मा.नगरसेवक,तसेच पाचोरा शहरातील सर्व व्यापारी बांधवानी व नागरिकांना शिवसेना युवासेना महिला आघाडी व्यापारी संघटना अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



