आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

इंदोर अमळनेर(परिवहन महामंडळाची)बस अपघात मधील मृतांची संख्या ?

इंदोर,दि १८- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली.आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदानदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची माहिती मिळाली.घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली असुन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु होते, आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात होते. सदर बस अपघातग्रस्त होवून नर्मदा नदीत कोसळल्यामुळे १२ प्रवासी मयत झाले असून मयतात ९ पुरुष ३ स्त्री यांचा समावेश असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सदर अपघातात जळगाव जिल्हयातील मयत झालेल्या प्रवासी यांची नावे खालीलप्रमाणे

१. प्रकाश श्रावण चौधरी, (वाहक) वय ४० वर्षे, रा. शारदा कॉलनी, अमळनेर

२. चंद्रकांत एकनाथ पाटील, (चालक) वय ४५ वर्षे, रा. अमळनेर

३. अविनाश संजय परदेशी, (प्रवासी) रा. पाटन सराई, ता. अमळनेर

४. निंबाजी आंनदा पाटील, (प्रवासी) वय ६० वर्षे, रा. पिळोदा, ता. अमळनेर

५. आरवा मुर्ताजा बोहरा, (प्रवासी) वय २७ वर्षे, रा. मुर्तीजापुर, अकोला, महाराष्ट्र (माहेर अमळनेर.)

तसेच इतर जिल्हयातील मयत प्रवासींची नावे

१. राजु तुळशीराम, (प्रवासी) वय ३५ वर्षे, रा. रावतफाटा, चित्तोडगढ, राजस्थान

२. जगन्नाथ हेमराज जोशी, (प्रवासी) वय ६८ वर्षे, रा. मुकामपुर मल्लाडा, उदयपुर, राजस्थान

३. चेतन रामगोपाल जागीड, (प्रवासी) रा. नाकगलकला गोविंदगढ, जयपुर, राजस्थान

४. सैफउद्दिन अब्बास अली बोहरा, (प्रवासी) रा. मुरानी नगर, इंदोर, मध्यप्रदेश

५. विकास सतीष बेहरे, (प्रवासी) वय ३३ वर्षे, रा. विरदेल, जि.धुळे, महाराष्ट्र,

६. कल्पना विकास उर्फ गुलाबराव पाटील, (प्रवासी) वय ५७ वर्षे, रा. बेटावद ता. शिंदखेडा जि.धुळे

७. रूख्मणीबाई नारायणलाल जोशी, (प्रवासी) रा. बागोर, उदयपुर, राजस्थान

घटनास्थळी जळगाव जिल्हा प्रशासन तर्फे तहसिलदार अमळनेर, पोलीस विभाग, आरोग्य अधिकारी नगरपालिका अमळनेर व तालुका आरोग्य अधिकारी अमळनेर यांचे पथक ३ रुग्णवाहिकांसह मदतीकरीता रवाना झाले.घटनास्थळी मदतीसाठी ०९५५५८९९०९१ हेल्पलाईन क्रमांक होय

.

.

.

(टिप: सदर माहिती आज दिनांक १८ जुलै, २०२२ वेळ दुपारी ०४.०० वाजेपर्यंतची आहे.)

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!