शेतकऱ्यांसह पाचोरा शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत उद्या काॅंग्रेसचा “दणका मोर्चा”

पाचोरा– पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह पाचोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत पाचोरा काॅंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असुन प्रशासनास जागे करण्यासाठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली १९ जुन रोजी सकाळी १० वाजता शहरातील मच्छी बाजार पासुन ते थेट प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत भव्य स्वरुपाचा “दणका मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी व शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिन सोमवंशी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाला भाव देऊन शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, पाचोरा व भडगांव तालुक्यातील उच्च
तापमानात केळी / मोसंबी आदी फळ झाडाचे नुकसान भरपाई तात्काळ द्या, पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात
महावितरण विज कंपनीच्या मनमानी कारभाराने ईलेक्ट्रीक पोलवर मिटर बसवण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, बाहेरपुरा भागातील भुयारी गटारीचे अपुर्ण काम त्वरीत करण्यात यावे, बाहेरपुरा भागात असलेली हिंदु स्मशान भुमीच्या लगत असलेला भुखंड तात्काळ पेव्हर ब्लॉक बसवुन पार्किंगसाठी देण्यात यावा, नेरी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांसाठी फरशीचे काम तात्काळ करण्यात यावे पुरवठा विभागातील प्रलंबीत लाभार्थीना तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा, ऑक्टोंबर – २०२२ ते मार्च – २०२३ मोफत धान्य व विकत धान्यांची चैकशी करण्या यावी. या मागण्यांसाठी येथील काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मच्छी बाजार ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच पाचोरा शहर व तालुक्यातील ज्यांना नविन रेशन कार्ड व धान्य मिळत नसेल त्यांनी आपले कागदपत्रे घेऊन मोर्चात सामील व्हा. असे आवाहन पाचोरा काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



