मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दि.4 :- मंडणगड पॅटर्नच्या धर्तीवर राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व 26 जून ते 26 जुलै, 2023 या कालावधीत साजरा करण्याचे आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे यांनी निर्देश दिले आहेत.
या कालावधीत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व विज्ञान महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याने जातवैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित महाविद्यालयाकडे ऑनलाईन अर्ज करुन हार्डकॉपी महाविद्यालयाकडे जमा करावी. याकामी सर्व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य यांना महाविद्यालयात संगणक, इंटरनेट सुविधा व प्रिंटर उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश समितीने दिलेले आहे.
तसेच तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून तालुकानिहाय सर्व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, समान संधी केंद्राचे प्रमुख व जात प्रमाणपत्र पडताळणी कामकाजाशी संबंधित कर्मचारी वर्ग यांचे एकदिवसीय शिबीर आयोजित करुन त्यामध्ये जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यपध्दती व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील इयत्ता 11 वी व 12 विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व कालावधीत अर्ज जमा करावेत. असे भा. उ. खरे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377