
जळगाव, दि.7 : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज हे पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरायचे असून या प्रक्रियेची अंतिम तारीख 10 ऑगस्ट, 2023 आहे. प्रवेश परीक्षा शनिवार, 20 जानेवारी, 2024 ला जिल्हा शिक्षण विभागाने निर्धारीत केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर वेळ 11.30 ते 1.30 या कालावधीत होईल.
या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in या लिंकवर उपलब्ध आहेत. सर्व सबंधीतांनी माहितीपत्रक काळजी पूर्वक वाचुन चालु वर्षी इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी (अटी पुर्ण करणारे) या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्हयातील सर्व इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबधीत पालक शिक्षक, मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या गटातील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहन द्यावे. अधिक माहितीसाठी श्री. बी. आर. व्दिवेदी- 7875404274/ 9422797110, श्री. हर्षद पवार-9921297951 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन व्ही. एस. अंभोरे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



