ना.गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह भाजपाचे अमोल शिंदे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर.
कुऱ्हाड व परिसरातील शेतकऱ्यांची रासायनिक खत व बोगस बियाणे वापरल्याने झालेल्या नुकसानाची केली पाहणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा, मंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद
पाचोरा :- जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात मागील १०-१५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस,सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांच्या रासायनिक खत टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.अमन मित्तल व पाचोरा भाजपा प्रमुख अमोल शिंदे यांनी कुऱ्हाड व सांगवी या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी मा.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागांना दिल्या.तसेच कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्याची संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून अहवाल 24 तासात दाखल करण्याचे आदेश दिले
पावसाळी अधिवेशनात कायदा होणार :
शेतकऱ्यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची पोस्ट गांभीर्याने राज्य सरकारने घेतली असून या अनुषंगाने दिनांक 16 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित करून बोगस बियाणे व बोगस खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असून याकरिता माननीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेले असून पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पाहणी दौऱ्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक श्री.अरविंद देशमुख, भाजपा तालुकाध्ययक्ष श्री. अमोल शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377