
पाचोरा दि ३:- येथील माजी आमदार स्व आर. ओ.पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांची सुकन्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी आणि पाचोरा भडगाव शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटना, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी आयोजित भव्य योगासन तसेच प्राणायाम महाशिबीराची 1 ऑक्टो पासून सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी व महिलांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला आहे.
जन्मदिनी विजया दशमीस स्व.आर.ओ पाटील यांचे प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.
कोरोना काळातील दोन वर्ष सदर कार्यक्रम घेताना न आल्याने नक्कीच सगळे लोक या योग शिबिरापासून वंचित होते त्यामुळे यावर्षी नागरिकांकडून भरभरून या आरोग्य शिबिरास प्रतिसाद पहावयास मिळत आहे.पहाटे साडे पाच वाजेस सुरू होत असलेल्या या शिबिरास मोठी गर्दी बघावयास मिळते. आरोग्याप्रती नागरिकांमध्ये जागृतता असून नियमित असे योग शिबिर आयोजित झाले पाहिजे असेही काहींनी बोलून दाखविले वैशालीताई यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांविषयीचे प्रेम त्यांचे विचार ,जनसामान्या विषयी असलेली कृतज्ञता, लोकाभिमुख कार्य,सेवा ,तत्वनिष्ठता जोपासून
हा लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा दृढनिश्चय करून आपली
सामाजिक बांधिलकी जपली आहे.असा सूरही यावेळी ऐकवयास मिळाला
पतंजली योग समिती हरिद्वार येथील स्वामी विप्र देव जी महाराज आणि स्वामी यज्ञ देव महाराज यांचे योग आणि प्राणायाम प्रशिक्षण दिले जात आहे . एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आलं असून शिबिरास निर्मल सीडचे महाव्यवस्थापक एस एस पाटील प्रमोद दळवी ,रवी चौरपगार, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंह सूर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, प्रशासन अधिकारी नंदू पाटील, एम एस पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष युवक युवती उपस्थित होत आहे.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



