राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाची जळगाव जिल्हयात गावठी दारु विरोधात धाडसत्र
जळगाव- जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार व पोलिस अधीक्षक श्री.एम.राजकुमार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. व्ही. टी.भुकन यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभटटी दारु विरोधात धडक कार्यवाहीची मोहीम राबविण्यात येत आहे, दिनांक 17 ऑगस्ट 2023 व 18 ऑगस्ट 2023 या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकुण 40 गुन्हे नोंदविले आहेत तसेच दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात आली असून त्यात 105 गुन्हे नोंदविले आहेत यात पोलिस विभागाचे सर्व पोलिस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सहभाग घेवुन राज्य उत्पादन शुल्क विभाग सदर कारवाई मध्ये 92 आरोपींना अटक केली असून इतर 13 आरोपींना गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या सहाय्याने शोध घेण्यात येत आहे.
सदर कारवाईमध्ये 1324 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आलेली असून गावठी दारु बनविण्यासाठी वापरले जाणारे एकुण 18673 लिटर रसायन नस्थ करण्यात आले आहे त्यात एकुण 752255/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकुण 400 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कारवाईमध्ये 66 लाखापेक्षा जास्त किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हयात हातभटटी दारु निर्मीती व विक्री करणा-या इसमांविरुध्द पहीलीच MPDA ची कारवाई यशस्वी करण्यात आलेली असून सदर इसमास अमरावती येथील कारागृहात स्थानबदध करण्यात आले आहे.
जिल्हयात हातभटटी दारु निर्मीती व विक्री करणा-या व्यक्तींमध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे जिल्हयात गावठी हातभटटी दारु समुळ नष्ठ करण्याचे मा. जिल्हाधीकारी यांचा निश्चय असून, जिल्हयात यापुढेही गावठी हातभटटी दारु विरुद्ध मोहीम सुरुच राहणार.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377