जळगाव, दि.30ऑगस्ट – यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील १२२३६ विद्यार्थ्यांनी मंगळवारी क्षमता चाचणी दिली. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची गणित व इंग्रजी विषयाची गुणवत्ता चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांनी सूचना दिल्या होत्या.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची पहिली गुणवत्ता क्षमता चाचणी २९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेंवर घेण्यात आली. यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील इ. ५ वी ते इ. १० वीच्या १३८३ मुले व १३०४ मुली असे एकूण २६८७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. तसेच अनुदानित आश्रमशाळेतील इ. ५ वी ते इ. १० वीच्या ६०१८ मुले व ३५३१ मुली असे एकूण ९५४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून प्रत्येक शासकीय व अनुदानित आश्रमशाळांवर नियुक्ती केली होती. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद जळगाव यांचे प्रतिनिधीसह ४ भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व शाळेमध्ये गुगलमीट अॅपद्वारे संनियंत्रण करण्यात आले.
निकालानंतर विद्यार्थ्यांची गुणात्मकदृष्टया छानणी करुन अप्रगत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करुन सदर विषयामध्ये गुणात्मक दर्जा वाढ करण्यात येईल, असे ही श्री. पवार यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377