पाचोऱ्यात मराठा समाजाचे धरणे आंदोलनाचा समारोप दि ८ सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा चे आयोजन
पाचोरा, दि.4 – येथील सकल मराठा समाजाच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्यात आले यावेळी दि. ८ सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा चा इशारा देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे मराठा माता भगिनी सह बांधवांवर जो अत्याचार झाला या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तहसील कार्यालया समोर एक दिवसीय महाधरणे आंदोलन करण्यात या आंदोलनात मराठा समाजासह इतर समाजाच्या संघटनांनी सहभाग घेतला यात मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,समता सैनिक दल, एकता अॉटो रिक्षा युनियन, अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान, समता परिषद, धनगर समाज संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट, मनसे, मुस्लिम संघटना, वचिंत बहुजन आघाडी या संघटनांनी पाठिंबा दिला यावेळी तहसीलदार श्री चव्हाणके यांना महाधरणे आंदोलन च्या समारोपाला दि ८ रोजी आक्रोश मोर्चा चे आयोजन चे निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन सोमवंशी, सुनील पाटील, विकास पाटील, भावडु पाटील अॅड अण्णासाहेब भोईटे, राजेंद्र पाटील, पप्पू राजपूत, किशोर डोंगरे, डी. एन. पाटील, संजय पाटील, योगेश पाटील, सुनील शिंदे, खलील देशमुख, वैभव पाटील, डॉ अनिल देशमुख, संतोष पाटील, मुकेश तुपे, गणेश पाटील, राहुल बोरसे, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. धरणे आंदोलनात शिवसेना उबाठा च्या वैशालीताई सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे संजय वाघ, नितीन तावडे भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शिवसेना शिंदे गटाचे रावसाहेब पाटील, सुनिल पाटील, गणेश पाटील आदींनी भेट दिली
दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भारत डेअरी स्टॉप कृष्णा पुरी पासुन निघणार आहे मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377