महसूली अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्धन्यायिक प्रकरणांबाबत प्रशिक्षण संपन्न
eqjcourts संकेतस्थळाचा प्रभावी करण्यासाठी प्रशिक्षण
जळगाव,दि.१३ सप्टेंबर – जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूली अर्धन्यायिक प्रकरणे eqjcourts संकेतस्थळाच्या माध्यमातून हाताळणी करण्याचे सविस्तर प्रशिक्षण आज देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील व मंडळाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना www.eqjcourts.gov.in (अर्धन्यायिक प्रकरणे) संकेतस्थळाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
महसूली अधिकाऱ्यांसमोर चालणाऱ्या प्रत्येक अर्धन्यायिक प्रकरणांची नोंदणी शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येते. यावेळी संकेतस्थळाच्या कार्यपद्धतीची प्राथमिक माहिती देण्यात येऊन त्यामध्ये केससंदर्भातील संबंधित वकीलांची नोंदणी करणे, अर्धन्यायिक कामकाज करीत असतांना केस व संबंधित पक्षकार नोंदणी, पक्षकार मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंदणी करणे, वादी व प्रतिवादी यांना सुनावणीच्या नोटीसेस तयार करणे, त्यानंतर केसनिहाय अहवाल तयार करणे, केस रोजनामा लिहिणे, बोर्ड तहकूब करणे व केस निकालासाठी बंद झाल्यानंतर निकाल (आदेश) अपलोड करणे, या सर्व बाबीची माहिती संकेत स्थळावर नोंदणीबाबत सविस्तररित्या मार्गदर्शन करण्यात आले. संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन सुध्दा करण्यात आले.
संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करण्यात आल्यास संबंधित पक्षकार वकील यांना त्यांच्या केसेसबाबतची अद्यावत माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यास मदत होईल. प्रत्येक अर्धन्यायिक प्रकरणांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रविण चोपडे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश पत्की, स्लिम सहायक भारत भगत, अव्वल कारकून संदिप जैस्वाल, घनश्याम सानप उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377