सोयगाव येथे तालुका स्थरिय आंतर शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा संपन्न
सोयगाव (छ.स.नगर), दि 20 – येथे सोयगाव तालुका क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा विभागांतर्गत मैदानी क्रिडा स्पर्धा संपन्न झाली. यात खो-खो, कबड्डी, व्हाँलिबाँल, क्रिकेट, कुस्ती, धावणे, थाळीफेक, योगा व बुद्धिबळ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील बुध्दीबळ स्पर्धेत १४ वर्षे गटात चि.चंद्रकांत विवेकानंद बागुल याची निवड झाली.
सोयगाव तालुका अंतर शालेय महाविद्यालय स्पर्धेचा शुभारंभ डॉ. निलेश गाडेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जगदिश जगताप, विद्याधर बागुल , शेख तोफिफ, संदीप निकम आदी उपस्थित होते.
आंतरशालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटामध्ये चंद्रकांत विवेकानंद बागुल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. चंद्रकांत बागुल व यज्ञेश विकास पाटील यांच्यातील सेमी फायनल चंद्रकांत जिंकून फायनल ला आदित्य ज्ञानेश्वर बोरसे यास पराभूत करून जिल्हा परिषद प्रशाला बनोटी येथील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी चंद्रकांत बागुलने १४ वर्षे वयोगटात बाजी मारली. या तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत माणिकराव पालोदकर विद्यालय फर्दापूर च्या इयत्ता १० वी ची विद्यार्थीनी कु. ऋतुजा किशोर वराडे हिने मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला.
१९ वर्षे वयोगट १०० मीटर रनिंगच्या स्पर्धेमध्ये अल्पेश कैलास सोनवणे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. मुलींच्या शंभर मीटर स्पर्धेमध्ये प्रगती ज्ञानेश्वर सोनवणे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला २०० मीटर रनिंगच्या स्पर्धेमध्ये अल्पेश कैलास सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ४०० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये जे. एम. एस. उच्च माध्यमिक विद्यालयात बनोटी येथिल विद्यार्थी प्रदीप शालिक पाटील या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर स्पर्धे मुलींच्या स्पर्धेत प्रगती ज्ञानेश्वर सोनवणे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळविलाह १७ वर्षे वयोगट १०० मीटरच्या स्पर्धेमध्ये स्वप्निल संदीप पगारे जिल्हा परिषद सोयगाव या मुलाने प्रथम क्रमांक मिळाला. मुलींच्या १०० मीटर स्पर्धेमध्ये राजश्री बाबुराव मिसाळ कैलासवासी बाबुरावजी काळे मराठी स्कूल सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला.२०० मीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये राजश्री बाबुराव मिसाळ कैलासवासी बाबुरावजी काळे मराठी स्कूल सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळवलाह तर २०० मीटर मुले यांच्या स्पर्धेमध्ये रितेश संतोष घोगरे जिल्हा परिषद सोयगाव या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रियंका शांताराम शिंदे मा.पा. महा.वि. फर्दापुर या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर मुलांच्या स्पर्धेमध्ये पंकज सुरेश वाघमारे मा . पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुले शंभर मीटर स्पर्धेमध्ये वसीम युनूस पठाण नॅशनल उर्दू हायस्कूल सोयगाव या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला १४ वर्षे मुलींच्या शंभर मीटर स्पर्धेमध्ये अंजली शरद जाधव माणिकराव पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला. २०० मीटर मुलांच्या स्पर्धेमध्ये वसीम युनूस पठाण नॅशनल उर्दू हायस्कूल सोयगाव या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. तर २०० मीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये नेहा संजय वाघ माणिकराव पा.महाविद्यालय फर्दापुर या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर मुले या स्पर्धेमध्ये आयान समीर तडवी माणिकराव पालोदकर महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये मानसी अनिल निकुंभ जिल्हा परिषद सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळविला. तीन किलोमीटरच्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मनोहर मंडाळे माणिकराव पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षे वयोगट १५०० मीटर स्पर्धेमध्ये जितूला गोसावी राजकुवर महाविद्यालय फर्दापूर या मुलाने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षे वयोगट पाच किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सतीश संतोष जोशी मा.पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगट मुले पंधराशे मीटर स्पर्धेमध्ये सुमित संजय वाघमारे माणिकराव पालोदकर महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगट ८०० मीटर स्पर्धेमध्ये जयेश दत्तू खैरनार जिल्हा परिषद बनोटी. या मुलाने प्रथम क्रमांक मिळविला १९ वर्षे वयोगट ८०० मीटर रनिंग च्या स्पर्धेमध्ये शफिक शेख हरुण जे.एम.एस. कॉलेज बनोटी या मुलाने प्रथम क्रमांक मिळविला. १४ वर्षे वयोगट ८०० मीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये निकिता शांताराम पाटील जिल्हा परिषद सोयगाव या मुलीने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगट मुली ८०० मीटर स्पर्धेमध्ये प्रियंका शांताराम शिंदे माणिकराव पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलीने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रियंका शांताराम शिंदे वय गट १७ मध्ये या मुलीने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगट मुलांमध्ये कासिम आलिम सैय्यद जिल्हा परिषद प्रश्नाला बनोटी या मुलाने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षे वयोगट गोळा फेक स्पर्धेमध्ये वाघमारे मा.पा. महाविद्यालय फर्दापुर या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धा सोयगाव येथे दोन दिवस घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक डॉ निलेश गाडेकर, व्ही. एम. बागुल, दिपक बनकर, प्राध्यापक उमेश वामने, सोहेल खान, शेख तौफिक आदींनी परिश्रम घेतले .
चि.चंद्रकांत विवेकानंद बागुल च्या उज्ज्वल भविष्यासाठी गटशिक्षणाधिकारी सोयगाव आर आर आढाव , शामराव फुसेकाका (शि.वि.अ), संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ.शिरीष पवार, उपप्राचार्य रावसाहेब बारोटे सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ निलेश गाडेकर, प्रा. उमेश नाना वामने, दिपक बनकर, सोहेल, शेख, तौफिफ पठाण,विस्तार अधिकारी सचिन पाटील, केंद्र प्रमुख नितीन राजपूत, जि. प. प्रशाला बनोटी चे मुख्याध्यापक जगदिश जगताप, एम. व्ही. पाटील, मयूर काळे, महादू नगरे, आर. डी. सोनवणे, संदीप येवले, नितीन पाटील, सैय्यद जे जे हुसेन, अमोल चिकटे, उज्वल जैन, मुख्तार शेख यांच्यासह जिल्हा परिषद प्रशाला बनोटी च्या शालेय समिती चे अध्यक्ष नानाभाऊ व सर्व सदस्य तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत चे अभिनंदन करतांना विदयार्थ्याच्या शैक्षणिक जिवणात मिळवलेले स्कुल लेव्हलचे उच्चतम प्रमाणपत्र एस. जि. फाय. हे असते यामुळे स्पोर्टस् कोठ्यातुन नौकरी लागले आणि तिन वेळा जर हे प्रमाणपत्र मिळाले तर क्लास टु च्या पोस्ट वर नियुक्ती होते याचे ज्वलंत उदाहरण तिन वेळा महाराष्ट्र केसरी झालेले मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हे असुन आज ते पुलीस आयुक्त आहेत असे बनोटी येथेल अंशकालीन शिक्षक अमोल चिकटे यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377