आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव,दि.६ ऑक्टोंबर – केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट‌ प्लेस (GeM) पोर्टल कार्यपद्धती, वस्तु व सेवांची खरेदी प्रक्रियेविषयी १२ ऑक्टोबर रोजी अल्पबचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व स्वायत्त संस्था यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जळगाव जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक‌ चेतन पाटील यांनी केले आहे.

शासन नियमानुसार GeM पोर्टलचा अधिकाअधिक वापर करून पोटलव्दारे वस्तु व सेवा खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार GeM) पोर्टलचा वापर अधिक कार्यक्षमतेने करुन या पोर्टलवरून होणारी खरेदी दुप्पटीने वाढविणेबाबत सूचित केले आहे. २०२२-२३ मध्ये राज्यामध्ये (GeM) पोर्टलवरून एकण झालेली खरेदीच्या स्वरुपात २०२३-२४ या आर्थिक वर्षात (GeM) पोर्टलवरून होणाऱ्या खरेदीबाबत तीन पट उदिष्ट प्राप्त झालेले असून तेवढ्या प्रमाणात खरेदी अभिप्रेत आहे. उद्योग विभागाने खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सूचना निर्गमीत केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये GeM) प्रणालीची प्रचार, प्रसिध्दी व व्याप्ती मोठया प्रमाणात होणे आवश्यक असल्याने या विषयी मुंबई उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना कार्यशाळा घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विकास आयुक्तांच्या सूचनानुसार जळगांव जिल्ह्यात १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजता या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत हॉल येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. असे ही चेतन पाटील यांनी कळविले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!