जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर.मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती
मुंबई – जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
मंत्रालयातील वॉर रूम येथे आज मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिववि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून जळगाव तालुक्यातील जळगाव,भोकर,म्हसावाद,नशिराबाद,असोदा,पिंप्राळा महसूली मंडळामध्ये,तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर,पहुर,शेंदुर्णी,वाकडी,मालदाभाडी,नेरी,तोंडापूर महसूली मंडळामध्ये,तालुका एंरडोल मध्ये एरंडोल,उमरदे (रिंगणगाव),कासोदा, उत्राण महसूली मंडळामध्ये, तालुका धरणगाव मध्ये धरणगाव,सोनवंद,पाळधी, पिंपरी खुर्द,साळवा, नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये,चांदसर तालुका भुसावळमध्ये भुसावळ,वरणगाव,कु-हे प्र.नृ,पिंपळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका बोदवड मध्ये बोधवड,करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, तालुका यावल मधील भालोद, किनगाव,साकळी,फैजपूर,बामणूद महसूली मंडळामध्ये,तालुका रावेळ मधील खिरडी,निभोंरा बुद्रुक महसूली मंडळामध्ये,तालुका मुक्ताईनगर मधील मुक्ताईनगर,अंतुर्ली,घोडसगाव महसूली मंडळामध्ये,तालुका पाचोरा मधील पाचोरा, नगरदेवळा,गाळण,पिंपळगाव हरेश्वर,कु-हाड,वरखेड बुद्रूक महसूली मंडळामध्ये, तालुका भडगांव मधील भडगांव,कांजगाव (गोंडगाव),आमडदे,कोळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका अमळनेर मधील अमळनेर,पातोंडा,भरवस,मारवड,अंमळगाव,शिरूड,वावडे महसूली मंडळामध्ये, तालुका चोपाडा मधील चोपडा,आडावत,गोरगावल बु,चाहाडा,धानोरा प्र.य.,लासुर महसूली मंडळामध्ये, तालुका पारोळा मध्ये बहादरपुर,घोरवड,शेवाळे बुद्रुक महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377