स्वप्निल बागुल यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार
पाचोरा- महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे खडकदेवळा ता. पाचोरा येथील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक स्वप्नील बागुल यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी कोकण येथे झालेल्या दिमाखदार समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन स्वप्नील शिवाजी यांचा गौरव करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 13 वी राष्ट्रीय परिषद सावंतवाडी कोकण येथील नगरपालिका नाट्यगृहात दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाली. या या परिषदेत स्वप्नील बागुल यांना सन्मानित करण्यात आले. स्वप्नील शिवाजी बागुल हे माध्यमिक विद्यालय खडकदेवळा या शाळेचे उपशिक्षक असून पाचोरा येथील अ.भा. मराठा महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक कार्यात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा बहुमान मिळालायाप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हासचिव प्रवीण मोरे (चाळीसगाव), गजेंद्र कानडे (दोंडाईचा), खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती कुंदा पाटील, उपशिक्षक चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, प्रा. डॉ. गिरीश पाटील (नाशिक), आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377