ट्रेड युनियन इंटरनॅशनल एनर्जीची पॅरीस (फ्रान्स) येथे दि.२७ ते ३० नोव्हे. २३ रोजी सभा भारताच्या उर्जा व कोळसा सेक्टरवर कॉ. मोहन शर्मा यांचे सादरीकरण
नागपूर – ट्रेड युनियन इंटरनॅशनल केमिस्ट्री आणि उर्जा संघटना ही उर्जा क्षेत्रातील ४० देशाच्या कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.उर्जा, कोळसा,पेट्रोलियम,परमाणु उर्जा क्षेत्रातील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिनांक २७ ते ३० नोव्हेबर २०२३ रोजी पॅरीस (फ्रांस) येथे प्रतिनिधी सभा आयोजित केली आहे.कॉ.मोहन शर्मा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष,ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) राष्ट्रीय सचीव या जागतिक संघटनेचे पदाधिकारी म्हणून तर कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन हे प्रतिनिधी म्हणून पॅरीसच्या सभेकरीता दिनांक २६ नोव्हेबर २३ रोजी मुंबई वरून पॅरीसला जात आहेत.
३० आक्टोबर १९२० साली स्थापन झालेली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस भारतातील सर्वात पहिली कामगार संघटना असून १०४ वर्षाचा कामगार चळवळीचा इतिहास संघटनेचा आहे. हा इतिहास व भारताच्या स्वातंत्र लढयात आयटकची कामगिरी,भुमिका,ब्रिटीशांच्या जुलमी राजवटी विरुध्द उभारलेले संप,आंदोलने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीच्या माहितीकरीता सादर करतील.
पॅरीसच्या सभेत प्रामुख्याने विविध देशांतील उर्जा उद्योग व कोळसा यावर विस्तृत चर्चा होणार असल्याने कॉ.मोहन शर्मा भारताच्या उर्जा उद्योगाची स्थिती, विद्युत निर्मिती त्यांत झालेली वाढ, वीज निर्मिती व वितरण क्षेत्रातील अडचणी आणि आव्हाने यावर विस्तृत पेपर सभेत मांडतील. त्याबरोबर कोळसा उद्योग व कोळसा पुरवठा,विदेशी कोळशाची आयात व उर्जा क्षेत्रात त्याचा व्यापार आणि प्रदुषणावरील परिणाम यावरही या निबंधात माहिती सादर करतील.
पॅरीसच्या या सभेत प्रतिनिधी म्हणून भागिदारी करण्यास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस व ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे राष्ट्रीय सचिव कॉ. कृष्णा भोयर हे सुध्दा उपस्थित राहणार असून ते महाराष्ट्राच्या उर्जा उद्योगाची माहिती सादर करतील.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377