पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील विविध रस्त्याच्या कामांचा शुभारंभ
पाचोरा: शहरातील खारवण भागातील रस्त्यांच्या विकास कामांचा आज नगरपरिषदेतर्फे प्रारंभ करण्यात आला हा भाग गेल्या 40 वर्षापासून दुर्लक्षीत होता रस्ता नसल्याने नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते, खराब रस्त्यामुळे वाहनांच्या समस्या, वृध्द, अपंग, लहान बालके यांना ये-जा करण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसाळयाच्या दिवसांमध्ये तर या भागात अक्षरश: चिखलाचे साम्राज्य होऊन परिसरात असलेल्या आदिवासी वस्तीत ये-जा करण्यासाठी तेथील रहीवाश्यांची अगदी तारांबळ उडत होती यावर न.पा.प्रशासनाने दखल घेत दलित वस्ती सुधार योजनेतून तात्काळ या रस्त्याचे काम हाती घेऊन तेथीलच मुळ रहीवासी नागरीक व रस्त्याचे काम करणारे कामगार यांच्या हस्ते कुदळ मारुन शुभारंभ दि.04/12/2023 रोजी करण्यात आला.त्याच प्रमाणे शहरातील कोंडवाडा गल्ली भागातील शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या पांचाळेश्वर मंदिराजवळील पुलाच्या तसेच पंचमुखी हनूमान मंदिर ते माहीजी रोड या भागातील सुरु असलेल्या रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर असून त्याची पाहणी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व अभियंता ईश्वर सोनवणे यांनी केली. विविध भागात सुरु असलेल्या विकास कामांमुळे त्या भागातील रहीवासी नागरीकांनी न.पा.प्रशासनाचे आभार मानले आहेत. यापुढे देखील विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377