पाचोऱ्यात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन
पाचोर दि,११- आमदार किशोर अप्पा पाटील यांचे स्थानिक विकास निधीतून सुमारे ३० लक्ष रुपये किमतीच्या विविध २५ प्रकारच्या साहित्याचे सुमारे ५०० लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता मोंढळा रोड वरील तुळजाई जिनिंग येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला तपासणी झालेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांचे वतीने करण्यात आले आहे.यापूर्वी भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना १० लक्ष रुपये किमतीचे साहित्य वाटप करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती, जिल्हा रुग्णालय व रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा प्रमुख सहभाग असून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेसह आमदार किशोर अप्पा पाटील ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांचेसह पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे ,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख एस पी गणेशकर यांचेसह शिवसेना युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे साहित्य वाटपाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांचे वतीने तालुकाप्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377