आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पाचोरा महाविद्यालयात दोन दिवशीय वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न


पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य,विज्ञान,व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे दिनांक 30 व 31 जानेवारी 2024 या दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री योगेश गणगे यांनी आपल्या उद्घाटन पर मनोगतात युवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृती जोपासावी असे आवाहन केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सुभाष पोतला (चेअरमन कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती पाचोरा) होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ संचालक खलीलदादा देशमुख, संचालक दुष्यंतभाई रावल उपस्थित होते .उद्घाटन समारंभानंतर महाविद्यालयात विविध कला गुण सादर करण्यात आले. यात गीत गायन स्पर्धा,समूह नृत्य, व वैयक्तिक नृत्य, नाटीका ,मिमिक्री,फॅन्सी ड्रेस या सारखे कलाप्रकार सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालं यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अहमदनगरचे डॉ. संजय कळमकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले,आपले आदर्श चित्रपटातील नट, नटी न ठेवता आई वडिलांना आदर्श माना असे प्रतिपादन डॉ संजय कळमकर यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडा स्पर्धेत पारितोषिके मिळविली अशा विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हा.चेअरमन व्ही. टी.जोशी प्रा.सुभाषजी तोतला गो.से हायस्कूलचे चेअरमन खलीलदादा देशमुख, श्री दगाजी वाघ, श्री. सतीश चौधरी,श्री प्रकाश पाटील श्री .योगेश पाटील ,पाचोरा पोलीस स्टेशनचे API धरमसिंह सुंदरडे श्री रंगराव पाटील, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, माजी प्राचार्य डॉ बी एन पाटील,डॉ एस एम पाटील,उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही पाटील उपप्राचार्य प्रा. जी बी पाटील पर्वेक्षक प्रा.साहेबराव पाटील पर्वेक्षक प्रा.राजेश मांडोळे ,प्रा. डॉ.श्रावण तडवी डॉ. जे पी बडगुजर आदी उपस्थित होते .प्रस्ताविक प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील व प्रा.वैशाली बोरकर डॉ.अतुल सूर्यवंशी प्रा.डॉ. सुनीता गुंजाळ यांनी केले तर आभार डॉ.जितेंद्र बडगुजर यांनी मानले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!