जिल्ह्यातील केळी पीक विमा अपीलात ६,६८६ प्रस्ताव मान्य, पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव दि.27 – जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ११०३२ इतक्या शेतक-यांचे केळी पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ८१९० शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी ६६८६ अपील पात्र झाले आहेत.
यापूर्वी केळी पीक विम्या बाबत 14 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार शेतकरी संघटना प्रतिनिधी बरोबर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर दि.26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील ११०३२ इतक्या शेतक-यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ८१९० शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल करण्यात आलेले होते त्यापैकी ६६८६ अपील पात्र असुन १५०४ अपील अपात्र करण्यात आलेले आहे.
जळगांव जिल्हयातील ६६८६ अपील पात्र शेतक-यांना हेक्टरी रक्कम पात्र महसुल मंडळ निहाय मिळणार असून ही रक्कम हेक्टरी ७०००० रुपये या प्रमाणे गुणांकन करुन येणारी रक्कम जळगांव जिल्हयातील पात्र शेतक- यांना मिळणे अपेक्षित असुन यास जिल्हासतरीय समिती कडून मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक चंद्रकांत पाटील,जिल्हा अग्रणी बँक व्य्वस्थापक,प्रणवकुमार झा, श्रीकांत झांबरे, व्यवस्थापक, नाबार्ड, हेमंत बाहेती, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, कृषि विक स अधिकारी, जि.प. जळगांव, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी सर्व हे उपस्थित होते तसेच जिल्ह विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377