मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा
कोल्हापू – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ या चिमुकलीचा दि 8 मार्च या महिलादिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या ‘शिवराज्य भवन’ कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखे, साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये १३ जून २०२३ मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव ‘दुवा’ असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. आज याच ‘दुवा’ चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377