आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोऱ्यात प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचे शनिवारी आ.किशोर पाटील यांचे हस्ते उदघाटन


पाचोरा,दि,७ – पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात साकारलेल्या शासकीय निवास्थानाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न होणार आहे
यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील,श्री शेलार, उपअभियंता श्री काजवे,अभियंता,उद्योगपती मुकुंद बिलदीकर,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील,माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील, अनिल धना पाटील, डॉ भरत पाटील,माजी सभापती पंढरीनाथ पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी,प्रवीण ब्राह्मणे यांचे सह सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.त्याची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.

पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवासस्थान असावे तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. – किशोर पाटील,आमदर पाचोरा- भडगाव

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!