आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण
Trending

गो से हायस्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पाचोरा, दि 15 – आज शाळेच्या पहिल्याच दिवशी श्री.गो. से. हायस्कूल मधील सकाळ व दुपार सत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेबाबत माहिती देऊन शालेय नियम व शिस्त तसेच शाळेची वेळ व वर्गशिक्षक यांचा परिचय करून देण्यात आला. शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. सर्व पाचवीचे उपस्थित विद्यार्थी व पालक यांना अल्पोपहार देण्यात आला. दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले व पुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात त्यांचे शाळेच्या प्रवेशद्वाराशी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील कला शिक्षकांनी शाळेचे सुशोभीकरण केले. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन .आर. पाटील ,पर्यवेक्षक ए .बी. अहिरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर .बी. तडवी. सकाळ व दुपार क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक आर बी बोरसे यांनी केले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\