राजधानीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 1 : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक व राजशिष्टाचार) आणि निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी पांडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



