आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव मनपातर्फे शहरात स्वच्छता मोहीम

जळगाव,दि.22-केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज जळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील 5 व्यापारी संकुलातील सिंगल युस प्लास्टिकचा 1.5 टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, मनपा उपआयुक्त शाम गोसावी, कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज ननावरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रासेयो जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर आदि उपस्थित होते.
सकाळी 7 वाजेपासून शहरातील महात्मा गांधी मार्केट, महात्मा फुले मार्केट, जुने बी.जे.मार्केट, नवीन बी.जे.मार्केट, गोलाणी मार्केटमध्ये कोरोना नियमांचे पालन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानाचा समारोप गोलाणी व्यापारी संकुलात करण्यात आला.

या संस्थांनी घेतला सहभाग
स्वच्छता अभियानात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव आकाशवाणी, रेडक्रॉस सोसायटी, सोशल लॅब, गोलाणी मार्केट सिंधी संगत आणि व्यापारी संघटना, मू.जे.महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, राष्ट्रीय सेवा योजना, नूतन मराठा महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा उपयोग करा : महापौर जयश्री महाजन
प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक असल्याने नागरीकांनी प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. आज जळगाव शहरातील व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी युवकांनी पुढाकार घेतला ही चांगली बाब आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक घडत आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या जल संवर्धन मोहिमेत देखील सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
सर्व तरुणांनी स्वच्छतादूत म्हणून पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नेहरू युवा केंद्र, जळगाव स्वयंसेवक यांच्यामार्फत जिल्हाभरात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची प्रशंसा करुन युवकांनी स्वच्छतादूत म्हणून पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. तसेच प्लॅस्टिक उपवास करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासियांना केले.
गोलाणी मार्केट सिंधी संगत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जवाहरलाल ललवाणी, सचिव महेश चावला, गिरधर धाबी. मोहिमेसाठी चाय शायचे साहिल मनवाणी, दीपेश रुपानी आदींनी सहकार्य केले. यावेळी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस पाटील, पल्लवी तायडे, दुर्गेश आंबेकर, मुकेश भालेराव, नेहा पवार, परेश पवार, राहुल जाधव, सागर नगाने, शंकर पगारे, दीपक खिरोडकर, मनोज पाटील, कोमल महाजन, रवींद्र बोरसे, हिरालाल पाटील, उमेश पाटील, अनिल बाविस्कर, रोहन अवचारे, दिगंबर चौधरी या नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन गिरीश पाटील, प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, आभार अजिंक्य गवळी यांनी मानले.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!